ICHMH51NEWS.IN
9921600800

दत्ताजीराव कदम आर्टस् , सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मध्ये प्राचार्य पदी प्रो.(डॉ) एस के खाडे रूजू

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दत्ताजीराव कदम आर्टस् , सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मध्ये प्राचार्य पदी प्रो.(डॉ) एस के खाडे रूजू

इचलकरंजी :
 येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित दत्ताजीराव कदम आर्टस् , सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये प्राचार्य पदी प्रो. (डॉ ) एस के खाडे हजर झाले . प्राचार्य प्रो. (डॉ ) एस के खाडे यांची श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय , कापशी, तालुका शाहूवाडी येथून संस्थाच्या आदेशाने बदली झाली .प्राचार्य डॉ . खाडे हे गेले ३५ वर्षे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध संस्कार केंद्रातून वनस्पतीशास्त्र या विषयाचे अधिव्याख्याते म्हणून कामकाज केले आहे . प्राचार्य डॉ खाडे इ . स २०२४ पासून श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय कापशी येथे प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारला . हे सर्व कार्य करत असताना सरांचे ५ राष्ट्रीय व ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत . त्याचबरोबर त्यांची विविध वर्गासाठीची वनस्पती शास्त्र सह विविध विषयाची २५ क्रमिक पुस्तके प्रसिद्ध आहेत .एक इंटरनॅशनल बुक सुद्धा प्रकाशित झालेले आहे . विद्यावाचस्पती म्हणजेच ( Ph. D . ) या पदवीचे मार्गदर्शक म्हणून काम पाहतात . त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ विद्यार्थ्यांनी Ph.D. डिग्री संपादन केली आहे . शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र या विषयाच्या अभ्यास मंडळावर सरांनी कामकाज केले आहे . अध्यापन विभाग या समितीवर काम केले आहे . तसेच आधीसभा सदस्य म्हणून ही शिवाजी विद्यापीठांमध्ये काम केलेले आहे .  या सर्व कार्याबरोबरच परीक्षा विभागातील ४८ ( ८ ) नुसार समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आहे .  असे अभ्यासू व्यक्तिमत्व , विविध कलागुणांनी संपन्न असणारे असे प्राचार्य महाविद्यालयात हजर झाल्याने महाविद्यालयाच्या विकासात अधिकच भर पडली आहे . सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी प्राचार्य प्रो. (डॉ )एस के खाडे यांचे सहर्ष स्वागत केले
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा