संत नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन
इचलकरंजी:
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी व परिसरातील आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
ADvt
या स्पर्धांचे हे ३५ वे वर्ष असून रविवार ६ जुलै पासून या स्पर्धांना प्रारंभ होणार आहे.श्री. नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवनिमित्त प्रतिवर्षी श्री नामदेव समाज सेवा मंडळ व श्री संत नामदेव युवक संघटना यांच्यावतीने आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
१ ली ते १० तील विविध गटात चित्रकला, सामान्यज्ञान, निबंध,बुध्दिबळ, वक्तृत्व , पाठांतर, गायन,वेशभूषा स्पर्धा होणार आहेत.सदर स्पर्धा मध्ये सहभागी होण्यासाठी नामदेव भवन,दाते मळा या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







