ICHMH51NEWS.IN
9921600800

इमनपाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘हास्य धमाका’ने समारोपाला रंगतदार पूर्णविराम आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून सामाजिक संस्था, प्रायोजक व नागरिकांचे आभार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमनपाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘हास्य धमाका’ने समारोपाला रंगतदार पूर्णविराम

आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून सामाजिक संस्था, प्रायोजक व नागरिकांचे आभार

इचलकरंजी: इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने जून महिन्यात विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचा समारोप रविवारी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे आयोजित ‘हास्य धमाका’ या रंगतदार कार्यक्रमाने झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे, आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि सहभागी कलाकारांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

‘हास्यजत्रा’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकार अरुण कदम, श्यामसुंदर रजपूत, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, आकांक्षा कदम, माया शिंदे, सपना हेमन, अक्षता सावंत, धनश्री दळवी, सुनील जाधव, संदीप डवरे, जयवंत भालेकर यांची उपस्थिती आणि बहारदार सादरीकरणामुळे संपूर्ण नाट्यगृह हास्यविनोदाने निनादून गेले.

सपना हेमन व अक्षता सावंत यांनी सादर केलेली हिंदी-मराठी गीते, तसेच आकांक्षा कदम, माया शिंदे, धनश्री दळवी यांचे नृत्य सादरीकरण विशेष आकर्षण ठरले.

Advt

आयुक्त पल्लवी पाटील यांनी यावेळी महापालिकेच्या विविध योजनांचा आढावा सादर करत आगामी विकास आराखड्याची माहिती दिली. आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी शहर विकासासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.

वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कार वितरित करण्यात आले. तसेच कार्यक्रमांचे प्रायोजक, सहकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

वृक्षारोपणासाठी आ.राहुल आवाडे यांच्या सहकार्याने गोल्ड विंग फाउंडेशनमार्फत १०००० रोपे महानगरपालिकेला देण्यात आली. याबद्दल आमदार आवाडे यांचा विशेष सत्कार झाला.

गर्दीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नाट्यगृहाबाहेर मोठ्या स्क्रीनचीही व्यवस्था करून नागरिकांना कार्यक्रमाचा आनंद घेण्याची संधी दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आयुक्त पल्लवी पाटील यांनी खासदार, आमदार, सामाजिक संस्था, प्रायोजक व नागरिकांचे आभार मानले.

फोटो-

स्मरणिका प्रकाशन करताना आ.राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर

हास्य धमाका कार्यक्रमात सादरीकरण करताना श्याम रजपूत व अरुण कदम

हास्यधमाका कार्यक्रमाचा शुभारंभ करताना आ.राहुल आवाडे,पल्लवी पाटील,सुषमा शिंदे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा