इचलकरंजी आगारातर्फे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांसाठी सवलतीच्या दरात विशेष बससेवा.
इचलकरंजी, दि. २ जुलै :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाअंतर्गत इचलकरंजी आगारातर्फे महिला, ज्येष्ठ नागरिक व भाविक प्रवाशांसाठी विविध तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे व पर्यटनस्थळांकरिता सवलतीच्या दरात बससेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमाची संकल्पना मा. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
दर आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी खालील मार्गांवर ही सेवा उपलब्ध असेल.
दर सोमवारी इचलकरंजी-मार्लेश्वर-
या योजनेतून प्रवाशांना सुलभ, सुरक्षित व परवडणारी प्रवास सेवा मिळणार असून, इच्छुक भाविकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रा.प. इचलकरंजी आगार व्यवस्थापनाने केले आहे. तसेच, गावातून इच्छित तीर्थक्षेत्री ग्रुप बुकींगद्वारेही बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







