ICHMH51NEWS.IN
9921600800

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचा उपक्रम — क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी सेवाभावाचे उदाहरण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचा उपक्रम — क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी सेवाभावाचे उदाहरण

इचलकरंजी
“एक हाक दातृत्वाची, क्षयरोग मुक्तीची!” या प्रेरणादायी घोषवाक्याला साकार करत इचलकरंजीच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाने सामाजिक जबाबदारीचे अनोखे उदाहरण सादर केले आहे. क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या मार्गावर पाऊल टाकत, रुग्णालयात क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट वाटप करण्यात आले.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, परिसेविका, औषध निर्माण अधिकारी आदींनी सेवाभावातून एक पाऊल पुढे टाकले. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना सहा महिन्यांसाठी दत्तक घेतले व त्या कालावधीत त्यांना पोषण किट देण्याची जबाबदारी स्वीकारली. आजच्या उपक्रमात एकूण २२ रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. मानसी कदम यांनी उपस्थित रुग्णांना क्षयरोगाविषयी योग्य आहार, औषधपद्धती आणि उपचार पूर्ण करण्याचे महत्त्व समजावले. सध्या शहरात १९७ क्षयरुग्ण उपचार घेत आहेत, त्यातील ६७ रुग्णांना ‘निक्षय मित्र’ लाभले असून उर्वरित १३० रुग्णांना अजूनही मदतीची गरज आहे.

उपस्थित डॉक्टरांमध्ये डॉ. अमित सोहनी, डॉ. प्रकाश मोरे, डॉ. आरती मित्रा, डॉ. संतोष चौगुले, डॉ. आस्मा पटवेगार यांचा समावेश होता. कार्यक्रमानंतर रुग्णालयाच्या नव्याने साकारलेल्या ‘आयुष गार्डन’मध्ये वृक्षारोपण करून निसर्गप्रेमाचाही सन्मान करण्यात आला.

फोटो

क्षयरोगीना पोषण आहार किट वितरण करताना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे अधिकारी

वृक्षारोपण करताना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा