ICHMH51NEWS.IN
9921600800

पुण्यात महात्मा गांधी पुतळ्याची विटंबना : इचलकरंजी काँग्रेसकडून कडक कारवाईची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात महात्मा गांधी पुतळ्याची विटंबना : इचलकरंजी काँग्रेसकडून कडक कारवाईची मागणी

इचलकरंजी – पुणे रेल्वे स्थानकाजवळ काल दिनांक ६ जुलै २०२५ रोजी एका माथेफिरू इसमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली असून, या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत इचलकरंजी शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी यांच्याकडे निवेदन सादर करून कडक कारवाईची मागणी केली आहे.

Advt

काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जरी सदर इसम मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असला तरी या घटनेमागे कोणाचे प्रोत्साहन आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. महात्मा गांधींनी देशाला अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले, परंतु आजही काही समाजकंटक त्यांच्याविरुद्ध द्वेषभावना बाळगून अशा विटंबनेचे प्रकार करत आहेत. याआधीही गांधीजींच्या फोटोवर गोळ्या झाडण्याचे प्रकार घडले आहेत.

ही एक नियोजित प्रवृत्ती असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मतही निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

या निवेदनावर शशांक बावचकर, बाबासाहेब कोतवाल, अजित मिणेकर,शशिकांत देसाई,किशोर जोशी, बिसमिल्ला गैबान व विद्या भोपळे यांची स्वाक्षरी आहे.

उपविभागीय अधिकारी दिपक शिंदे यांना निवेदन देताना शहर कॉंग्रेसचे शशांक बाबचकर,अजित मिणेकर व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा