ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत पाण्याचा गोंधळ : १ तास येणारे पाणी ३ तास गटारीत!

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत पाण्याचा गोंधळ : १ तास येणारे पाणी ३ तास गटारीत!

बघा व्हिडीओ

https://youtube.com/shorts/cHftWq6YBjY?si=2sfcf5rEXdcAthz_

 

इचलकरंजी – शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील हलगर्जीपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावली सोसायटी येथील रहिवासी पंकज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ७ वाजता पाणीपुरवठा सुरू झाला आणि तब्बल १० वाजेपर्यंत म्हणजे ३ तास पाणी वाहत राहिले. दररोज साधारण १ ते दीड तासच पाणीपुरवठा होत असताना तीन तास पाणी गटारीत वाहत होते
विशेष म्हणजे, पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती स्थानिक कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांना देखील नव्हती. नागरिकांनी संपर्क साधल्यावर त्यांनी उलट उत्तर दिलं की, पाणी तर सकाळी येणार आहे!
एकीकडे शहरातील अनेक भागांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना ५-७ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे, टँकर लावावे लागत आहेत, तर दुसरीकडे इतक्या महत्त्वाच्या स्रोताचा असा उघड अपव्यय होत असल्याने महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचे गंभीर उदाहरण आहे.
आयुक्तांनी कित्येक वेळा यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत असल्या तरी विशेष काही फरक पडताना दिसत नाही

नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, पाणीपुरवठा विभागाने याची गंभीर दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी व अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची हमी द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा