ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबईत विशेष बैठक – आ. राहुल आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबईत विशेष बैठक – आ. राहुल आवाडे

इचलकरंजी
 इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील दीर्घकालीन समस्या,अपुऱ्या कर्मचारी व सुविधा व  रुग्णसेवेतील अडचणी आदी मुद्द्यांवर ठोस निर्णय घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली  विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सोमवार, दि. १४ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.३० वा. दालन क्र. ०३४, विधानभवन, मुंबई येथे होणार आहे.
या संदर्भात माहिती देताना इचलकरंजीचे आमदार मा. राहुल आवाडे यांनी सांगितले की, “इचलकरंजी रुग्णालयाच्या विविध तांत्रिक अडचणी, अत्यावश्यक सुविधा, वैद्यकीय कर्मचारी व सोयीसुविधा यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. त्यासंदर्भात मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.”
Advt
बैठकीस आ. राहुल प्रकाश आवाडे यांच्यासहसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई,आयुक्त आरोग्य सेवा, मुंबई, संचालक व सहसंचालक (रुग्णालये), सहसंचालक (अर्थ व प्रशासन),अधीक्षक अभियंता (पा.सु.वि.क), आरोग्य सेवा, मुंबई यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा