ICHMH51NEWS.IN
9921600800

उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळच अमली पदार्थ विक्रीवर कारवाई- तीन आरोपींना अटक,२.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळच अमली पदार्थ विक्रीवर कारवाई- तीन आरोपींना अटक,२.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त.

इचलकरंजी.
 कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि “मिशन झिरो ड्रग्ज” उपक्रमाअंतर्गत इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयापासून जवळच केलेल्या या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल २,३६,९६४/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मा. आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने आणि गुन्हे शोध पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.
 संग्राम अशोकराव पाटील (वय २९) – रा. वृंदावन अपार्टमेंट, श्रीपादनगर, इचलकरंजी.सचिन सुनिल मांडवकर (वय २५) – रा. यशवंत कॉलनी, इचलकरंजी,अभिषेक गोविंद भिसे (वय २५) – रा. लालनगर, इचलकरंजी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी इचलकरंजी परिसरात Mephentermine Sulphate Injection नावाचे अंमली इंजेक्शन विकले जात असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळा रचून संग्राम पाटील याच्या घराबाहेर सचिन मांडवकर याला ५ बॉटल इंजेक्शनसह ताब्यात घेतले. त्यानंतर संग्राम पाटीलच्या घरातून १८ बॉटल, तर सहआरोपी अभिषेक भिसे याच्याकडे ७ बॉटल आणि त्याच्या घरातून २२ बॉटल तसेच ६०,०००/- रोख रक्कम जप्त करण्यात आली.
कारवाईत Mephentermine Sulphate Injection: ५२ बॉटल्स (किंमत ₹२१,९६४/-) व रोख रक्कम: ६०,०००/-
मोबाईल फोन्स: ३ (किंमत ४५,०००/-)दुचाकी वाहने: २ (किंमत ₹१,१०,०००/-) असा एकूण २,३६,९६४/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
वरील कारवाई पो.नि. महेश चव्हाण, स.पो.नि. पूनम माने, पो.ह. अनिल पाटील, सुनील पाटील, पो.ना. फिरोज बेग, पो.अं. अमर शिरढोणे, बाजीराव पोवार, आदित्य दुंडगे, ताहीर शेख व चालक पो.ह. इंगवले (SDPO कार्यालय, इचलकरंजी) यांनी केली.
अटक केलेल्या आरोपींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी
जप्त केलेल्या अमली पदार्थाच्या बाटल्या.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा