ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी बसस्थानकात २४,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास,४ महिलांविरोधात गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी बसस्थानकात २४,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास,४ महिलांविरोधात गुन्हा

इचलकरंजी:

इचलकरंजी बसस्थानकात बसमध्ये चढत असलेल्या आरोग्य सेविकेला अडवून अनोळखी चार महिलांनी तिच्याकडील २४,५०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फरनाज आसिफ सनदी (वय ४३, रा. कोल्हे मळा, इचलकरंजी) या आरोग्य सेविका फिर्यादी आहेत. त्या सांगलीकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना चार अनोळखी महिलांनी त्यांना अडवले. तोंडावर स्कार्फ बांधलेल्या या महिलांनी त्यांच्या बदामी रंगाच्या पर्सवर झडप घालत हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रतिकार करताच महिलांनी त्यांना घेरून धक्का-मुक्की केली. फिर्यादी यांची बहीण अनिसा मदतीला आली असता तिलाही बाजूला ढकलून पर्स हिसकावली. या पर्समध्ये ६५०० रुपये रोख, सुमारे १८ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅमचे मंगळसूत्र, बँक ऑफ बडोदाचे एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र व मोटरसायकलची चावी होती.या प्रकरणी सहाय्यक फौजदार संदीप आबिटकर यांनी फिर्याद नोंदवली असून तपास पीएसआय साने करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा