वस्त्रोद्योगाच्या विविध योजनांसाठी यंत्रमागधारकांनी माहिती पाठवण्याचे पॉवरलूम असोसिएशनचे आवाहन.
इचलकरंजी
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत वस्त्रोद्योगासाठी वेगवेगळ्या योजना राबविणेत येत असतात. तसेच नविन योजना तयार करणेसाठी त्यांना त्या-त्या क्षेत्रातील माहितीची आवश्यकता असते. त्यास अनुसरून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने वस्त्रोद्योग आयुक्तांच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांसोबत नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये यंत्रमाग उद्योगाबाबत सविस्तर चर्चा करणेत आली. या चर्चेअंती यंत्रमाग उद्योगाचा डेटा गोळा करणेबाबत निर्णय घेणेत आला. त्यास अनुसरून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या मुंबई येथील क्षेत्रीय कार्यालयाचा ईमेल दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनला प्राप्त झाला आहे. सदर ईमेलमध्ये वस्त्रोद्योग आयुक्तालयाने यंत्रमागधारकांना ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी गुगल फॉर्म https://forms.gle/
Advt
तरी इचलकरंजी शहर व परिसरातील सर्व यंत्रमाग उद्योजकांनी वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या तसेच नविन योजना तयार करणेसाठी वस्त्रोद्योग आयुक्तालयाने दिलेल्या गुगल फॉर्मवर जाऊन विहीत नमुन्यात आपला अर्ज भरावा असे आवाहन दि इचलकरंजी पॉवलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







