ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत जीवघेण्या हल्ल्यात महिला जखमी-५ जणांवर गुन्हा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत जीवघेण्या हल्ल्यात महिला जखमी-५ जणांवर गुन्हा 

इचलकरंजी:

गावभाग परिसरातील सानवी लेडीज ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर पाच जणांनी संगनमताने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. फटाक्यांवरून सुरू झालेला किरकोळ वाद हिंसक वळणावर जाऊन गंभीर मारहाणीमध्ये परिवर्तित झाला. या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुनम प्रशांत कुलकर्णी (वय ४३ व्यवसाय – ब्युटी पार्लर चालक, रा. जैनबस्ती, इचलकरंजी) या आपल्या भाड्याच्या दुकानात (सानवी लेडीज ब्युटी पार्लर, जगताप तालीम जवळ)  होत्या. त्याच दरम्यान, सलमान राजू नदाफ (रा. परिटगल्ली, गावभाग, इचलकरंजी) आणि त्याचे साथीदार  अविनाश पडीयार, आरसलान सय्यद, यश (पूर्ण नाव अज्ञात), आंबादास (पूर्ण नाव अज्ञात) हे परिसरात फटाके उडवत होते. त्यातील एक फटका फिर्यादीजवळ येऊन पडल्याने त्यांनी सलमान नदाफ याला समजावण्याचा प्रयत्न केला.

Advt

मात्र या छोट्याशा कारणावरून संतप्त झालेल्या आरोपींनी संगनमताने “हिला संपवून टाकूया” असे म्हणत वादाचे रूपांतर हल्ल्यात केले. सलमान नदाफ याने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले, तर अविनाश पडीयार याने लोखंडी एडक्याने त्यांच्या उजव्या हातावर जोरदार वार केला. यावेळी इतर आरोपींनी देखील शिवीगाळ करत ब्युटी पार्लरचे दरवाजे, खिडक्या, बोर्ड यांची तोडफोड केली. याशिवाय शेजारील दयानंद लाड यांच्या दुकानाच्या शटरचे आणि सागर पाटील यांच्या संडासच्या दरवाज्याचेही नुकसान करण्यात आले.

फिर्यादींच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास म.सपोनि. पुनम माने या पो.नि. महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा