ICHMH51NEWS.IN
9921600800

प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर तलवारीने हल्ला – पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर तलवारीने हल्ला – पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

इचलकरंजी:
प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून पाच जणांनी संगनमत करून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना रविवारी  दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीजवळील कबनुर, लक्ष्मी माळ भागातील आभार फाटा येथे घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advt
याप्रकरणी वैभव अनिल पुजारी (वय २३, व्यवसाय मजुरी, रा. बिरोबा मंदिर शेजारी, चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली असून, त्यांनी प्रेमविवाह केला होता.या विवाहाचा राग मनात धरून बंडा शिंदे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याने इतर चार जणांना चिथावणी दिली.त्यानंतर आरोपी मयुर आकाराम पुजारी (रा. चंदूर), ओंकार बिरु पुजारी (रा. तिळवणी), शुभम बोरसे (रा. उदगाव), आणि राहुल श्रीकांत कांबळे (रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) यांनी मिळून फिर्यादीचा मोटारसायकलवर पाठलाग केला.
फिर्यादी हे आभार फाटा परिसरात आले असता, आरोपींनी “तुझी आता काही खैर नाही, तुला जिवंत सोडणार नाही” असे म्हणत त्यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी फिर्यादी जवळच्याच एका घरात गेले असता आरोपींनी त्या घरात घुसून शिवीगाळ केली आणि तलवारीने डोके, पाठ व हातावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात फिर्यादीचा जीव घेण्याचा  प्रयत्न करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीला तातडीने इचलकरंजी येथील आय. जी. एम. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर पोलिस निरीक्षक दिलीप पोवार, तपासी अधिकारी म.स.पो.नि. परुळे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा