इचलकरंजीत रस्त्याच्या वर गटाराची उभारणी,सततच्या अपघाताने नागरिक हैराण.
बघा व्हिडीओ
https://youtube.com/shorts/g88bj26AKAI?si=0LqUUO7HqirGF6dA
इचलकरंजी :
शहरातील लायकर चित्रमंदिर मागील भागात रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच गटार बांधण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. सदर चुकीच्या कामामुळे सतत अपघात होण्याच्या घटना समोर येत असून, पावसाच्या पाण्याचा निचरा देखील अडथळलेला आहे.
या चुकीच्या कामामुळे वाहनचालकांना धक्के बसून जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसात गटाराची उंची दिसत नसल्यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढते. या भागातून जाणाऱ्या नागरिकांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या असून, लाखो रुपयांचे वेतन घेणारे अभियंते नेमके काय तपासणी करतात, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या कामाची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







