ICHMH51NEWS.IN
9921600800

पंचगंगा नदीतून येणाऱ्या जुन्या दाबनलिकांच्या बदलास सुरुवात,पाणीपुरवठा होणार अधिक सक्षम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पंचगंगा नदीतून येणाऱ्या जुन्या दाबनलिकांच्या बदलास सुरुवात, पाणीपुरवठा होणार अधिक सक्षम.

इचलकरंजी:

इचलकरंजी शहराला पंचगंगा नदीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या जुन्या आणि गळती निर्माण करणाऱ्या दाबनलिकांचे बदलण्याचे महत्त्वाचे काम आजपासून सुरू करण्यात आले. या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते झाला.

सदर पाइपलाइन प्रथम १९६५ साली टाकण्यात आली होती. त्यावेळीची लोकसंख्या लक्षात घेऊन ती पुरेशी होती, मात्र सध्या लोकसंख्या आणि पाण्याची मागणी वाढल्याने ही पाइपलाइन अपुरी आणि जुनी झाली आहे. वारंवार गळतीमुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत होता.

Advt

महानगरपालिका प्रशासनाने या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता नव्याने बसवली जाणारी ७५० मिमी व्यासाची दाबनलिका आधुनिक आणि पुरेशा क्षमतेची आहे. या कामामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत, अखंड आणि सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

शुभारंभप्रसंगी माजी सभापती श्रीरंग खवरे, राजु बोंद्रे, अमृत भोसले, राजु रजपुते, मारुती पाथरवट, नगरसेविका सुषमा भिसे, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, शाखा अभियंता डॉ. बाजी कांबळे, मक्तेदार मौला बागवान, तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा शुभारंभ करताना आ.राहुल आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे,आयुक्त पल्लवी पाटील,श्रीरंग खवरे,अमृत भोसले,शशी मोहिते व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा