ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीराम चौक, तारदाळ येथे बंद घर फोडून १.५४ लाख रुपयांचा ऐवज लंपास

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीराम चौक, तारदाळ येथे बंद घर फोडून १.५४ लाख रुपयांचा ऐवज लंपास

इचलकरंजी

शहापूर : तारदाळ येथील श्रीराम चौक, संगमनगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुबराव दत्तु कोळी (वय ६५, व्यवसाय दिवाणजी काम, रा. श्रीराम चौक, संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे घर बंद करून बाहेर गेले असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी तिजोरीचे दार उचकटून त्यामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १,५४,०००/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

चोरीला गेलेल्या ऐवजात एक तोळ्याचे सोन्याचे पदक असलेले गंठण ६०,०००/-,अर्धा तोळा सोन्याचा मणी असलेला टिका ३०,०००/-,काळ्या मण्यांचे मंगळसूत्र व दोन सोन्याच्या वाट्या १८,०००/-,तीन ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे टॉप्स १८,०००/-,तीन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या१८,०००/- व १०,००० रोख रक्कम यांचा समावेश आहे.या घटनेनंतर सुबराव कोळी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुटे करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा