ICHMH51NEWS.IN
9921600800

आंबेडकर पुतळा ते इंडस्ट्रीयल इस्टेट रोड परिसरातील नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आंबेडकर पुतळा ते इंडस्ट्रीयल इस्टेट रोड परिसरातील नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.

बघा व्हिडीओ-

https://youtube.com/shorts/cbqh603d8_Q?si=l-nD7CbEUYtHqQ1D

 

इचलकरंजी –

शहरातील आंबेडकर पुतळा ते इंडस्ट्रीयल इस्टेट रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा रंग काळसर असून दुर्गंधी येत आहे. या पाण्यामुळे नागरिकांना गंभीर आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या समस्येमुळे दिनानाथ होंगाडे, मिलिंद जगताप, आनंद कोकळकी, विक्रांत पोटे, श्रीनिवास सातपुते, राजेश मंगलाणी, धनंजय होंगाडे आणि प्रकाश कुलकर्णी या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून पाणी पिण्यायोग्य नसल्याने स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत.

“आम्हाला  काळसर, घाण वास असलेले पाणी नळातून येते. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो. लहान मुलांना आणि वृद्धांना याचा विशेष त्रास होतो आहे,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक रहिवाशाने दिली.

महानगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन जलवाहिनीची तपासणी करून स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा