ICHMH51NEWS.IN
9921600800

महादेव नगरमधील गटारीची दुरावस्था कायम,आयुक्तांकडूनही तक्रार बेदखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महादेव नगरमधील गटारीची दुरावस्था कायम,आयुक्तांकडूनही तक्रार बेदखल बघा व्हिडीओ- https://youtube.com/shorts/nR4yXX6-ppM?si=JoHDWLItu_V5kiMo

 

इचलकरंजी –

महादेव नगर परिसरातील गटारीला (डहाळ) करण्यात आलेला नाही. यामुळे पाण्याचा निचरा होत नसून पाणी तुंबून राहिल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधी,अस्वच्छतेचा धोका वाढला आहे. याबाबत नागरिक जय पाटील यांनी तीन वेळा – 20 डिसेंबर 2024, 13 जानेवारी 2025 व 29 जानेवारी 2025 रोजी – इमेलद्वारे आयुक्तांना तक्रार केली होती.तसेच संबंधित महापालिका अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष भेटीगाठी करत वारंवार विनंतीही केली. मात्र, अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याने नागरिक वैतागले आहेत. मक्तेदाराच्या चुकीच्या कामावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे का नाही असा प्रश्न नागरिकांना पडत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे परिसरातील स्वच्छता व आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.आयुक्तांनी ही या प्रकरणाकडे का दुर्लक्ष केल्याने दाद मागायची कुणाकडे असे नागरिक विचारत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा