ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दोन दिवसांची कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दोन दिवसांची कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न

इचलकरंजी
– इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे नुकतीच पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठीमार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी  दोन दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली .महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, उपायुक्त (शिक्षण) अशोक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण अधिकारी बी. एम. कासार यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि १००% निकालाचे उद्दिष्ट समोर ठेवून ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी मराठी माध्यम हायस्कूलमध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विषयवार सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये मराठी विषयासाठी गारगोटीचे संजय शिंदे यांनी भाषा संकल्पना आणि विश्लेषण, तर कासारवाडीचे साताप्पा शेरवाडे यांनी उत्तरलेखन कौशल्यांवर मार्गदर्शन केले. इंग्रजी विषयासाठी निळपणचे वाय. पी. पाटील यांनी अभ्यास पद्धती आणि फेजिवडेचे दिगंबर वाईगंडे यांनी भाषेची अचूकता आणि रचना यावर मार्गदर्शन केले. गणितासाठी नवरसवाडीचे सुनील देसाई आणि राधानगरीचे दीपक पाटील यांनी अभ्यासक्रम आणि सुलभ उपाय सांगितले. बुद्धिमत्तेसाठी अणपवाडीचे आबासाहेब पसारे, फेजिवडेचे गणेश पाटील आणि कासारवाडीचे शाहू चव्हाण यांनी मूलभूत संकल्पना, चाचणीचे प्रकार आणि समस्या सोडवण्याच्या पद्धतींवर प्रकाश टाकला.
कार्यशाळेच्या सांगता समारंभाचे अध्यक्षस्थान उपायुक्त अशोक कुंभार यांनी भूषवले, तर प्रशासन अधिकारी इरफान पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून शाळा क्र. ३६ चे दिलीप माने आणि पर्यवेक्षक म्हणून राजेंद्र घोडके यांनी जबाबदारी सांभाळली.
बैठकीत मार्गदर्शन करताना उपायुक्त अशोक कुंभार समोर उपस्थित शिक्षक वर्ग
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा