आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून ‘महादेवी’संदर्भात मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी बोलविली मुंबईत बैठक.
इचलकरंजी:
शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील सर्वांची लाडकी महादेवी उर्फ माधुरी हत्तीण संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार 5 ऑगस्ट रोजी मुंबई येथे तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. आमदार राहुल आवाडे यांनी या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असता मंगळवारी ही तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहेे.
नांदणी येथील मठात गेली ३५ वर्षे असणार्या महादेवी हत्तीणीला पेटा या संस्थेच्या माध्यमातून गुजरात येथील वनतारा प्रकल्पात नेण्यात आले आहे. या विरोधात तीव्र जनभावना निर्माण झाली असून शिरोळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात महादेवी हत्तीणला परत आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने लढे सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत या संदर्भातील माहिती दिली होती.
त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार ५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे महादेवी उर्फ माधुरी हत्तीण संदर्भातील विषयावर तातडीने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस सर्व लोकप्रतिनिधी, नांदणी मठाचे प्रमुख तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित अधिकार्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत महादेवी संदर्भात निश्चितपणे योग्य असा तोडगा निघेल, असा विश्वासही आमदार आवाडे यांनी व्यक्त केला आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800