ICHMH51NEWS.IN
9921600800

सांगली रोडवर खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सांगली रोडवर खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त,

व्हिडिओ-https://youtube.com/shorts/d7xRDLIn91I?si=cVZcPyYN1ZG-Z63R

 

सांगली रोड येथे राज कॅसल हॉटेलसमोर मोठा खड्डा पडल्याने नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे हा खड्डा दिसत नसल्याने आज सकाळपासून तीन ते चार नागरिक या खड्ड्यात पडल्याची घटना घडली आहे.

अपघाताची शक्यता ओळखून परिसरातील नागरिकांनी खड्डा दिसावा म्हणून वाळूची पोती ठेवून तात्पुरती उपाययोजना केली आहे. मात्र, हा उपाय अपुरा ठरत असून त्वरित खड्डा मुजविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सदर ठिकाणी तातडीने बॅरिकेटर्स उभारून अपघात टाळावेत व खड्डा भरून नागरिकांचे प्राण वाचवावेत, अशी जोरदार मागणी महानगरपालिकेकडे होत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा