ICHMH51NEWS.IN
9921600800

क्लेरिंगचा फज्जा — व्यापारी अडचणीत; बँकांकडून तातडीने उपाययोजनेची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

क्लेरिंगचा फज्जा — व्यापारी अडचणीत; बँकांकडून तातडीने उपाययोजनेची मागणी

इचलकरंजी : ४ ऑक्टोबरपासून (CTS) चेक क्लेरिंग प्रक्रियेत बदल करण्यात आला असून, ज्या त्या दिवशी चेक बँकेत जमा केल्यानंतर पैसे खात्यावर जमा करण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात चेकची रक्कम ३-४ दिवस उलटूनही खात्यावर जमा होत नसल्याने ग्राहक आणि व्यापारी या दोघांनाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. सणासुदीच्या काळात पैशांची गती मंदावल्याने बाजारपेठेवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Advt

दरम्यान, “तांत्रिक अडचणींमुळे चेक क्लिअरिंग सेवा विलंबित आहे. कृपया व्यवहारांसाठी NEFT, RTGS, IMPS किंवा UPI चा वापर करा. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनःपूर्वक दिलगीर आहोत,” असे बँकांकडून ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे.

“क्लेरिंग प्रक्रियेतील विलंबाबाबत माझे नोडल ऑफिसर गणेश गोडसे यांच्याशी थेट बोलणे झाले आहे. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी आम्ही केली आहे. व्यापाऱ्यांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात चेकद्वारेच होत असल्याने या समस्येचा बाजारपेठेवर गंभीर परिणाम होत आहे. बँकांनी त्वरित पावले उचलली पाहिजेत,”
— चंद्रकांत पाटील, चेअरमन पॉवरलूम असोसिएशन

“दिवाळीच्या तोंडावर क्लेरिंग अडचणींमुळे बाजारात पैशांची आवक मंदावली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास याचा विपरीत परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर होईल.”
— विनय महाजन, अध्यक्ष यंत्रमागधारक जागृती संघटना

“डिजिटल व्यवहार वाढले असले तरी इचलकरंजीत चेकद्वारे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण होऊ नये यासाठी प्रशासन आणि बँकांनी तातडीने कार्यवाही करावी.”
— तौफिक मुजावर, उद्योजक आधार सामाजिक संस्था

व्यापारी वर्गात या विषयावर संतापाची लाट असून, बँकांनी तांत्रिक अडचणी दूर करून तत्काळ व्यवहार सुरळीत करावेत, अशी एकमुखी मागणी केली जात आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा