सोशल मिडियावर जातीय तेढ प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
इचलकरंजी:
सोशल मिडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अनिकेत सुनिल साळुंखे (रा. धुळेश्वरनगर, कबनूर) याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी योगेश माळगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीन इंस्टाग्राम आयडीवर महापुरुषांच्या बद्दल अपमानास्पद मजकूर पोस्ट केला. या पोस्टमुळे दोन समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







