ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत बारसमोर कोयत्याने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत बारसमोर कोयत्याने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इचलकरंजी:
इचलकरंजीतील योगायोग नगर येथील आर. के. बारसमोर झालेल्या वादातून कोयत्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अक्षय संजय गायकवाड (वय ३०, रा. चंदूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मित्र शिवा दोडमणी व आरोपी प्रविण नाईक यांच्यात वाद सुरू होता. वाद सोडविताना फिर्यादीने मित्राची बाजू घेतल्याचा राग मनात धरून प्रविण नाईक याने आपल्या साथीदारांना घटनास्थळी बोलावले.
यानंतर आरोपी ओंकार शंकर गोरनाळे याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला, तर शशि मोरे याने कोयत्याने सचिन जळणे यांच्या डोक्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मुल्लाणी करत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा