ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईच्या ६ विद्यार्थ्यांची शाही एक्सपोर्टमध्ये आकर्षक पॅकेजवर निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या ६ विद्यार्थ्यांची शाही एक्सपोर्टमध्ये आकर्षक पॅकेजवर निवड

इचलकरंजी :
 येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल इंजिनिअरींग व डिप्लोमा विभागातील ६ विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य गारमेंट उत्पादन उद्योगसमूह शाही एक्सपोर्ट, शिमोगा येथे आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे. उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक तांत्रिक प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव यांचा प्रभावी संगम घडवून विद्यार्थ्यांना सक्षम अभियंता बनविण्यात डीकेटीई सातत्याने अग्रस्थानी राहिले आहे.
शाही एक्सपोर्ट कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी डीकेटीईला भेट देऊन लेखी परीक्षा व वैयक्तिक मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली. डिप्लोमा विभागातून प्रविण पाटील व पवन यादव, तर डिग्री विभागातून ओंकार माने, केदार यादव, प्रतिक्षा कुरुंदवाडे आणि ऋतुराज जाधव यांची निवड झाली.
विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

डीकेटीईच्या शाही एक्सपोर्ट कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यासमवेत कार्यकारी संचालक रवी आवाडे, डॉ एल.एस. आडमुठे, डॉ यु जे पाटील व एस बी अकिवाटे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा