दारू पिण्याच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून; दोघे ताब्यात
इचलकरंजी :
दारू पिण्याच्या वादातून अथवा अज्ञात कारणावरून तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना शांतीनगर ते इंदिरानगर रस्त्यावरील कस्तुरबा गांधी विद्यालयालगतच्या महानगरपालिका गाळ्याजवळ घडली. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत विवेक सुरेश अग्रवाल (वय २३, रा. कोरोची, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मोठा भाऊ विकी सुरेश अग्रवाल (वय २५) याचा खून करण्यात आला. पोलिसांनी अल्पवयीन बालक तसेच रिमोन आवळे व अलोक देवर्षी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
१९ मे रोजी रात्री साडेअकरा ते २० मे रोजी सकाळी साडेसात दरम्यान ही घटना घडली. आरोपींनी दगडाने कपाळावर वार करून विकी अग्रवाल याला गंभीर जखमी करत ठार मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी क्रमांक १ व २ पोलिस ताब्यात असून पुढील तपास पो नि चव्हाण करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





