ICHMH51NEWS.IN
9921600800

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची नात सांभाळणार कन्या महाविद्यालयाची धुरा.कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ श्रुती जोशी यांची नियुक्ती.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची नात सांभाळणार कन्या महाविद्यालयाची धुरा.कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ श्रुती जोशी यांची नियुक्ती.

इचलकरंजी

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी विवेकानंद महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक आणि इंग्रजी विषयाच्या विभागप्रमुख माननीय डॉ.श्रुती जोशी यांची नियुक्ती झाली आहे. महाविद्यालयातील प्रो. डॉ.त्रिशला कदम यांच्याकडून त्यांनी प्रभारी प्राचार्यपदाचा पदभार स्विकारला.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा एक अविभाज्य भाग असणारं कन्या महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी पुन्हा एकदा परमपूज्य शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणारी व्यक्ती विराजमान झाली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरामधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

काही वर्षांपूर्वी माननीय डॉ.शैलजा साळुंखे मॅडम यांनी या महाविद्यालयांमध्ये प्राचार्य पदी काम करताना या महाविद्यालयाची एक वेगळी ओळख निर्माण केली होती आणि तोच वारसा जपत त्यांच्या कन्या प्रा.डॉ. श्रुती जोशी याही काम करतील असा विश्वास सर्वांनाच आहे.

प्रा.डॉ.श्रृती जोशी यांनी याआधी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालय,मिरज व विवेकानंद महाविद्यालय,कोल्हापूर येथे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केले आहे.

संस्था प्रशासन,गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांच्यामधील दुवा म्हणून त्यांच्याकडून उत्कृष्ट काम होईल आणि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढेल,अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या, तसेच त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रो डॉ त्रिशला कदम,डॉ धीरज शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्राचार्य श्रुती जोशी यांचे स्वागत करताना त्रिशला कदम व पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा