ICHMH51NEWS.IN
9921600800

व्यंकटराव हायस्कूलजवळील सार्वजनिक मुतारी पाडल्याने नागरिकांत संताप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

व्यंकटराव हायस्कूलजवळील सार्वजनिक मुतारी पाडल्याने नागरिकांत संताप

इचलकरंजी :
 शहरातील मध्यवस्ती भागातील व्यंकटराव हायस्कूलजवळील सार्वजनिक मुतारी भर दुपारी जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आल्याने नागरिकांत संताप व नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली सहा सीटर पुरुष मुतारी अचानक पाडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
व्यंकटराव हायस्कूलच्या पूर्व बाजूस असलेली ही सार्वजनिक सुविधा नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक मानली जात होती.मध्यवस्तीत असलेली मुतारी पाडण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होणार असल्याचे बोलले जात आहे. “गरजेची सार्वजनिक सुविधा उभारण्याऐवजी ती पाडण्यामागचे कारण काय?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शौचालय विभागाचा अहवाल नकारात्मक असताना तसेच आरोग्य विभागाची कोणतीही टिप्पणी नसताना बांधकाम विभागाने संबंधित मुतारी जीर्ण झाल्याचा बनावट अहवाल तयार करून ती पाडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जात असून चौकशीची मागणी होत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा