“स्वयंपूर्ण प्रकाशमान महाराष्ट्र बनवूया” : आमदार राहुल आवाडे
इचलकरंजी :
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने १०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या “स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफटाॅप” याेजनेचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते येथील महावितरण विभागीय कार्यालयात करण्यात आला.
यावेळी बाेलताना आमदार आवाडे म्हणाले, “या याेजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवून स्वयंपूर्ण व प्रकाशमान महाराष्ट्र घडवूया. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सुमारे 30 हजार वीज ग्राहकांना याेजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरातील १६ प्रभागांसह ग्रामीण भागात विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत.” तसेच एकही पात्र ग्राहक वंचित राहणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
महापाैर उदय धातुंडे व उपमहापाैर अनिल डाळ्या यांनीही पात्र लाभार्थ्यांनी या याेजनेचा लाभ घेऊन शून्य वीज बिल संकल्पनेला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल यांनी याेजनेची माहिती देत बीपीएल व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या सवलती स्पष्ट केल्या. यावेळी पहिल्या १० लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले.
योजनेच्या शुभारंभ प्रसंगी आ.राहुल आवाडे,महापौर उदय धातूंडे,उपमहापौर अनिल डाळ्या,स्थायी समिती सभापती सतीश मुळीक,महावितरणचे अधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





