राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा रविवारी त्रैवार्षिक स्नेहमेळावा
इचलकरंजी/प्रतिनिधी –
जुन्या आठवणींना उजाळा देत, शालेय जीवनातील मैत्री पुन्हा नव्याने अनुभवण्याची संधी देणारा येथील राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल माजी विद्यार्थी संघ आयोजित त्रैवार्षिक स्नेहमेळावा रविवार २४ मे रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. मराठा मंडळ सांस्कृतिक भवन, तांबे माळ येथे सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत हा मेळावा रंगणार आहे, अशी माहिती अध्यक्ष वसंतराव सपकाळे आणि कार्याध्यक्ष इराण्णा सिंहासने यांनी दिली.
आठवणींचा सोहळा, स्नेहाचा मेळावा या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात आजवरच्या सर्वच बॅचमधील माजी विद्यार्थी एकत्र येणार असून जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी, शालेय आठवणी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. यावेळी माजी विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात हायस्कूलमध्ये सकाळी ८ वाजता स्वागताने होणार असून त्यानंतर प्रार्थना, राष्ट्रगीत व कवायत होईल. सकाळी ९.३० वाजता नाश्ता व चहापानाचा कार्यक्रम आहे. यानंतर सकाळी १० ते १०.३० या वेळेत माजी विद्यार्थी रॅली आयोजित करण्यात आली असून तिचा मार्ग हायस्कूल ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा मार्गे मराठा मंडळ सांस्कृतिक भवन असा असणार आहे. त्यानंतर नाव नोंदणी, गुरुजनांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम होईल.
दुपारच्या सत्रात स्नेहभोजन, फनी गेम्स, गप्पा, व्यावसायिक गीत गायन, स्पॉट गेम्स तसेच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या स्नेहमेळाव्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९४२२०४७४०८, ९८२३७७९६७६ किंवा महिला प्रतिनिधी ९८५०७३७०५९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





