पैशासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहाजणांवर गुन्हा
इचलकरंजी :
पैशांची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पतीसह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रांगोळी (ता. हातकणंगले) येथे घडली.
स्वाती राहुल यादव (वय २९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल यादव, हर्षवर्धन यादव, मित्रजीत यादव, पूर्णिमा कांबळे, तानाजी इंगवले व उज्वल शेवाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी वेळोवेळी पैशांची मागणी करून तिचे स्त्रीधन परस्पर विकले. तसेच मारहाण करून घराबाहेर काढले. त्यानंतर फिर्यादी माहेरी रांगोळी येथे राहत असताना आरोपींनी तेथे जाऊन तिच्या आई-वडील व भावाला मारहाण व शिवीगाळ केली. घराचे गेट व काचेचे साहित्य फोडून नुकसान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पो हे कॉ. शिंदे करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





