ICHMH51NEWS.IN
9921600800

मजुरीवाढ निर्णय प्रलंबितच; दोन दिवसांत पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मजुरीवाढ निर्णय प्रलंबितच; दोन दिवसांत पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

इचलकरंजी :
शहरातील मजुरीवाढीच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. ट्रेडिंगधारकांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने चर्चा निष्फळ ठरली आणि मजुरीवाढीचा निर्णय पुन्हा प्रलंबित राहिला.
बैठकीत खर्चीवाले आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. मजुरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, वाढता तणाव लक्षात घेता पुढील दोन दिवसांत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे. या बैठकीत मजुरीवाढीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आंदोलनकर्त्यांचे लक्ष आता या बैठकीकडे लागले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा