इचलकरंजी महापालिकेच्या सभेत त्रयस्थ एजन्सीचा विषय पुढील सभेत तर बायोमायनिंग वरून तेलनाडेंच्या सभात्याग
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेत विविध ९ विषयांवर निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत त्रयस्थ एजन्सी तर्फे मिळकतीची मोजणी करण्याचा प्रस्ताव पुढील सभेत घेण्याचा निर्णय झाला तर कमी रक्कमेचे बायोमायनिंग काम जादा रक्कमेस दिले असून तो विषय विषयपत्रिकेवर घेत नसल्याच्या कारणावरून नगरसेवक संजय तेलनाडे यांनी सभात्याग केला. गुजराती समाजास जागा देण्याच्या विषयावर आवाडे समर्थक नगरसेवक राजु बोंद्रे व हाळवणकर समर्थक नगरसेवक प्रदीप धुत्रे यांच्यात खडाजंगी झाली त्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांतील हाळवणकर गट आक्रमक होताना दिसत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





