ICHMH51NEWS.IN
9921600800

महागाईविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक; इचलकरंजीत तीव्र निदर्शने

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महागाईविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक; इचलकरंजीत तीव्र निदर्शने

इचलकरंजी :
 वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि केंद्र-राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गुरुवारी इचलकरंजीत तीव्र निदर्शने करण्यात आली. महात्मा गांधी पुतळा परिसरात झालेल्या या आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान गॅस सिलेंडर व दुचाकीची तिरडी उभारून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. तसेच महिलांनी चौकातच चूल पेटवून वाढत्या महागाईविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी परिसर सरकारविरोधी घोषणांनी दणाणून गेला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. यावेळी बोलताना चौगुले म्हणाले, “पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी पार गेले आहेत. गॅस सिलेंडर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मात्र सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. शेतकरी, कामगार आणि युवकांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.”
माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील यांनीही आपल्या भाषणातून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी तालुकाप्रमुख आनंदा शेट्टी, माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, माजी शहरप्रमुख धनाजी मोरे, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटिका मंगलताई मुसळे, तालुका संघटिका शोभा गोरे, स्नेहल मस्के, माजी नगरसेवक मनोज भाट, शिवानंद हिरेमठ, विजय जोशी, गणेश शर्मा, लक्ष्मण पाटील, बसय्या स्वामी, गणेश जंगटे, उमेश पाटील, शीतल मगदूम, युवासेनेचे अभिजित लोले, सागर जाधव, रतन वाझे, अरविंद मस्के, संतोष लवटे, कुबेर लाटवडे, अजय घाडगे, मेहबूब पठाण, दिलीप पुरोहित, बाबासाहेब जाधव, उदयसिंह शिंदे, धोंडीराम कोरवी, गणेश नाईक, उमेश शिंदे, शकील शेख, विक्रम जाधव, शाहीर अगनू लवटे, शोभा कोलप, अविनाश धुळुगडे, विशाल दंडवते, संतोष गौड, दीपक नरदेकर, जोहेब हलगले, प्रवीण मस्के, पवन मेटे, सुरज लाड, अजित कडाले, प्रथमेश कंदले, दिलीप शिंदे, संदीप शिनगारे, प्रशांत करडे, यशवंत चव्हाण, सुरेश चव्हाण, अंकुश रवंदे, निखिल निपाणे, सचिन खोंद्रे, सुजित कुलकर्णी, सुमित पवार, लक्ष्मी बुरले, श्रद्धा मस्के, सत्यभान पाटोळे, अनिता जाधव, सुनीता चव्हाण यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा