ICHMH51NEWS.IN
9921600800

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे पेट्रोल पंपांवर आंदोलन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे पेट्रोल पंपांवर आंदोलन

इचलकरंजी :
केंद्र सरकारने एका आठवड्यात दोन वेळा केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहरातील विविध पेट्रोल पंपांवर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
“इंधन दरवाढ रद्द करा”, “महागाई कमी करा”, “भाजप हटाव, देश बचाव”, “मोदी सरकार हटाव, देश बचाव” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी केंद्र सरकारवर टीका करत पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत दरवाढ रोखून निवडणुकांनंतर तातडीने इंधन दरवाढ करून जनतेच्या खिशाला कात्री लावल्याचा आरोप केला.
सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड महागाईला सामोरे जावे लागत असून भविष्यातही अशाच प्रकारे ठराविक कंपन्यांना फायदा पोहोचविण्याचे धोरण राबवले गेले तर सामान्य माणसाचे जीवन अधिक कठीण होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनात शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल, युवराज शिंगाडे, अब्राहम आवळे, अजित मिणेकर, रविराज पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा