ICHMH51NEWS.IN
9921600800

बनावट अहवाल करून पाडलेल्या मुतारीबाबत महापौरांकडून चौकशीचे आश्वासन-इनाम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बनावट अहवाल करून पाडलेल्या मुतारीबाबत महापौरांकडून चौकशीचे आश्वासन-इनाम

इचलकरंजी :
व्यंकटराव हायस्कूलजवळील सार्वजनिक मुतारी पाडल्याप्रकरणी तसेच शहरातील विविध नागरी समस्यांबाबत इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने महापौरांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित मुतारीबाबत बनावट जीर्ण अहवाल तयार करून ती पाडल्याचा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची दुरवस्था, भूमिगत केबल टाकण्याच्या कामामुळे उघडी ठेवलेली चेंबर्स, तसेच दुभाजक, सर्कल व आयलंडवरील सुशोभीकरणामुळे निर्माण झालेल्या दृश्यमानतेच्या समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले.
यावेळी महापौरांनी व्यंकटराव हायस्कूलजवळील मुतारी का पाडण्यात आली याची चौकशी करून पुढील योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच जीर्ण झालेल्या मुताऱ्यांचे अंदाजपत्रक तयार करून त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगितले.
भूमिगत केबल कामादरम्यान उघडी ठेवलेली चेंबर्स तातडीने मुजवण्यात येतील तसेच शहरातील रस्ता दुभाजक व सिग्नल परिसरात वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची कटिंग करून दृश्यमानतेचा प्रश्न सोडविण्यात येईल, अशी ग्वाहीही महापौरांनी दिली.यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक उपस्थित होते.
इनामतर्फे यावेळी शितल मगदुम, महेंद्र जाधव, उदयसिंह निंबाळकर, सचिन कांबळे, कपिल ढवळे, अभिजित पटवा आदी उपस्थित होते.

महापौर उदय धातूंडे व स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांना निवेदन देताना इनामचे सदस्य.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा