ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत कापड ताग्यांची ३.१८ लाखांची चोरी; शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत कापड ताग्यांची ३.१८ लाखांची चोरी; शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

इचलकरंजी :
शहरातील जुना चंदूर रोड परिसरातील दुर्गामाता मंदिराजवळील कारखान्याच्या उघड्या शेडमधून अज्ञात चोरट्याने तब्बल ३ लाख १८ हजार ६२५ रुपयांचे कापडाचे तागे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य रविंद्र तावरे (वय २९, व्यवसाय कापड व्यापारी, रा. महेश कॉलनी, इचलकरंजी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही चोरी १३ मे  रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते २२ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली.
जुना चंदूर रोडवरील दुर्गामाता मंदिराजवळ असलेल्या कारखान्याच्या उघड्या शेडमधून अज्ञात चोरट्याने १ लाख ३५ हजार १२५ रुपये किमतीचे अरविंद लिमिटेड या नावाचे काठ असलेले २५० कापड तागे (सुमारे २७५० मीटर) तसेच १ लाख ८३ हजार ५०० रुपये किमतीचे शंकर टेक्स या नावाचे काठ असलेले २६ कापड तागे (सुमारे ४५०० मीटर) असा एकूण ३ लाख १८ हजार ६२५ रुपयांचा माल चोरून नेला.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा