ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीतील वाहतूक समस्यांवर शिवसेनेचे निवेदन; आंदोलनाचा इशारा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीतील वाहतूक समस्यांवर शिवसेनेचे निवेदन; आंदोलनाचा इशारा

इचलकरंजी :

शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेच्या वतीने वाहतूक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नदीवेश नाका, सांगली नाका, यड्राव फाटा, कबनूर नाका आणि पंचगंगा फॅक्टरी नाका येथे नियमित वाहतूक पोलिसांची नियुक्ती नसल्याने वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याचे सांगण्यात आले. यड्राव फाट्यावर रस्ता दुरुस्तीच्या कामादरम्यान डंपरच्या धडकेत एका वाहनचालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचाही उल्लेख करत याला जबाबदार कोण, असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी उपस्थित केला.

शहरातील बेवारस वाहने, ट्रान्सपोर्ट व ट्रॅव्हल्स वाहनांच्या बेशिस्त पार्किंगवर तातडीने कारवाई करावी, तसेच शाळा व महाविद्यालये सुरू व सुटण्याच्या वेळेत वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी वाहतूक सेना जिल्हाप्रमुख शिवानंद हिरेमठ यांनी केली. मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मलकारी लवटे, शिवाजी पाटील, संजय पाटील, संदीप यादव, महबूब पठाण, सागर जाधव, विशाल धुमाळ, सागर कुराडे, गुंडू विटांना, सूरज जंगटे, स्वप्निल गजबर, राजू नेजे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पो.नि.विकास शिंदे यांना निवेदन देताना जिल्हाप्रमुख संजय चौगुले,नगरसेवक शिवाजी पाटील व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा