खोतवाडीजवळ डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
इचलकरंजी :
जयसिंगपूर–इचलकरंजी मार्गावरील खोतवाडी येथे भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश विठ्ठल शिंदे (वय ३६, रा. एच.एम. स्पोर्ट तरुण मंडळ, नांदणी, ता. शिरोळ) हे टीव्हीएस स्पोर्ट (एमएच ५१-७२२४) या दुचाकीवरून आरटीओ कार्यालय, शहापूर येथे जात होते. दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास खोतवाडी येथील हॉटेल आनंदसमोर त्यांच्या दुचाकीला मागून एमएच १० सीआर ९४९५ क्रमांकाच्या डंपरने जोरदार धडक दिली.
या अपघातात सतीश शिंदे गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डंपर चालक दशरथ लक्ष्मण व्हनमोरे (वय ४८, रा. सांगलवाडी, ता. मिरज, जि. सांगली) याने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी अजित भाऊसो सूर्यवंशी (रा. रामनगर, नांदणी, ता. शिरोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार मुंगसे करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





