ICHMH51NEWS.IN
9921600800

व्यसनमुक्त इचलकरंजीसाठी आमदार राहुल आवाडे यांची पुढाकार; गुटखा, मावा व अंमली पदार्थांवर कठोर कारवाईची तुकाराम मुंडेंकडे मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

व्यसनमुक्त इचलकरंजीसाठी आमदार राहुल आवाडे यांची पुढाकार; गुटखा, मावा व अंमली पदार्थांवर कठोर कारवाईची तुकाराम मुंडेंकडे मागणी

इचलकरंजी :

वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या इचलकरंजी शहरात मावा, गुटखा, गांजा तसेच इतर अंमली पदार्थांची वाढती विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कामगार आणि तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शहरात प्रतिबंधात्मक आणि कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. आयुक्त मुंडे यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

निवेदनात इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून देशभरातून रोजगारासाठी अनेक कुटुंबे येथे स्थायिक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, औद्योगिकीकरणाबरोबरच शहरात अवैध व्यवसायांनाही चालना मिळत असून कर्नाटक सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधी तंबाखू आणि सुपारीची तस्करी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील अनेक पानटपऱ्यांवर अवैधरीत्या मावा विक्री सुरू असून, मावा तयार करताना त्यामध्ये गांजाचे पाणी मिसळले जात असल्यामुळे तरुण पिढी नशेच्या विळख्यात अडकत असल्याची गंभीर बाबही निवेदनात मांडण्यात आली आहे.

याशिवाय शहरात अंमली पदार्थांसह नशेची इंजेक्शने आणि गोळ्यांचाही साठा आढळून आल्याचा उल्लेख करत, पोलिसांकडून कारवाई होत असली तरी या प्रकारांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनासह संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

विशेषतः कर्नाटक सीमावर्ती भागातून होणारी गुटखा तस्करी रोखण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आमदार आवाडे यांनी अधोरेखित केली. तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि “व्यसनमुक्त इचलकरंजी” घडविण्याच्या उद्देशाने त्यांनी उचललेल्या या पावलाचे शहरवासीयांकडून स्वागत होत असून समाधान व्यक्त केले जात आहे.

तुकाराम मुंडेना निवेदन देताना आ.राहुल आवाडे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा