वीज सवलतीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी कॅम्प-पॉवरलूम असोसिएशन
इचलकरंजी
यंत्रमागधारकांच्या वीज सवलतीसाठीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना येत असलेल्या अडचणी सोडविणेसाठी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनमध्ये रविवार पासून ३ दिवसांचे मार्गदर्शन शिबीर (कॅम्प) आयोजन करणेत आले आहे.
नुकतेच इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने वस्त्रोद्योग मंत्री मा.संजय सावकारे यांची भेट घेऊन यंत्रमाग उद्योजकांना ऑनलाईन नोंदणी करताना येत असेल्या अडचणींबाबतची माहिती देणेत आली होती. यावेळी वस्त्रोद्योग मंत्र्यांनी याची दखल घेऊन नोंदणी करताना येत असलेल्या अडचणी तातडीने सोडविणेच्या सुचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार रविवार दि. ०५ जुलै रोजी सकाळी १०.३० पासून दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनमध्ये मार्गदर्शन शिबीरसाठी (कॅम्प) नागपूर येथील वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाचे टेक्नीकल अधिकारी उपस्थित राहून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना आलेल्या त्रृटी दूर करणे, फॉर्म भरताना येत असलेल्या अडचणी दूर करणे व नविन फॉर्म भरणेचे मार्गदर्शन करणार आहेत.
त्यामुळे सर्व यंत्रमागधारकांनी आपआपल्या यु.आय.डी. नंबर, पासवर्ड व कागदपत्रांसह रविवार दि. ०५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





