ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत २ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त; आणखी एका संशयिताला अटक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत २ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त; आणखी एका संशयिताला अटक

इचलकरंजी :
शिवाजीनगर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाईत २ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त करत एका आरोपीकडून महत्त्वाची माहिती मिळवली आहे. या प्रकरणात अमित कृष्णा भुईम्बर याच्याकडून गांजा जप्त करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा सखोल तपास करत पोलिसांनी  शोध घेतला असता, जप्त केलेला गांजा सिद्धाराम महादेव कुडगी याच्याकडून घेतल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी सिद्धाराम महादेव कुडगी यालाही अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून ‘फॉरवर्ड लिंक’चा शोध घेत पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, अपर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज कॅम्प-इचलकरंजी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने, हेड कॉन्स्टेबल किशोर सूर्यवंशी तसेच पोलीस कर्मचारी शिरीष कांबळे, विकास चौगुले, संग्राम पाटील आणि गणेश सनदी यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा