ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीई-इटा (जर्मनी) सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना सर्वखर्चासह जर्मनीत प्रशिक्षणाची संधी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीई-इटा (जर्मनी) सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना सर्वखर्चासह जर्मनीत प्रशिक्षणाची संधी

इचलकरंजी :

डीकेटीई टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि जर्मनीतील अ‍ॅकेन विद्यापीठाशी संलग्न जागतिक ख्यातीच्या इटा (Institute of Textile Technology) संस्थेदरम्यान भारत टेक्स २०२६ प्रदर्शनात सामंजस्य करार (Letter of Intent) करण्यात आला. या करारामुळे डीकेटीईच्या टेक्स्टाईल शाखेतील विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे सर्वखर्चासह प्रशिक्षण जर्मनीमध्ये घेण्याची संधी मिळणार असून, प्रशिक्षणानंतर प्लेसमेंटचीही सुविधा उपलब्ध होणार आहे.

इंडो-जर्मन यंग लीडरशिप प्रोग्रॅमअंतर्गत झालेल्या या करारावर इटाच्या वतीने प्रा. थॉमस ग्रीस, तर डीकेटीईच्या वतीने उपसंचालक डॉ. यू. जे. पाटील, डीन डॉ. एस. बी. वनबट्टे आणि डॉ. एस. एम. लांडगे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी वस्त्रोद्योग आयुक्त वृंदा देसाई (आयआरएस) आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचे संचालक अश्विनीकुमार पांडे (आयएएस) उपस्थित होते.

या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना जर्मन भाषा प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय नेतृत्व विकास, शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन तसेच जर्मनीतील उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे यांचे मार्गदर्शन या उपक्रमासाठी लाभले असून, संस्थेच्या जागतिक शैक्षणिक वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

दिल्ली येथे भारत टेक्समध्ये डीकेटीई व इटा,जर्मनी यांच्यात कराराचे आदन प्रदान करताना प्रा. थॉमस ग्रीस, डॉ यु.जे.पाटील,वस्त्रोद्याग आयुक्त वृंदा देसाई, वस्त्रोद्योग मंत्रालयाचे संचालक अश्‍विनीकुमार पांडे इतर मान्यवर. 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा