SIR प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी मनसेचे निवेदन; प्रांताधिकाऱ्यांकडून BLOंना तत्काळ सूचना
इचलकरंजी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) इचलकरंजी शहरच्या वतीने SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात BLO यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करावी, प्रलंबित मॅपिंग तातडीने पूर्ण करावे, प्रत्येक भागात SIR सहाय्यता केंद्र सुरू करावे, मतदारांना योग्य मार्गदर्शन करावे आणि सर्व पात्र मतदारांना संधी मिळावी यासाठी प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. निवेदनाची तात्काळ दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन BLOंना घरपोच पडताळणी, प्रलंबित मॅपिंग पूर्ण करणे आणि SIR प्रक्रिया नियमांनुसार प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, मनोहर जोशी, अनिल झाडबुके, रोहित कोटकर, ऋषिकेश मराठे, संदीप पवार, दिलीप जाधव, नरेंद्र गोंदकर, राजेश माळी व तन्मय तांबे उपस्थित होते.
प्रांत कार्यालयात निवेदन देताना मनसे कार्यकर्ते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







