श्री नामदेव समाज सेवा मंडळार्ते आंतरशालेय स्पर्धांचे आयाेजन
इचलकरंजी –
संत शिराेमणी नामदेव महाराजांच्या 676 व्या समाधी महाेत्सवानिमित्त ’श्री नामदेव समाज सेवा मंडळ’ आणि ’श्री संत नामदेव युवक व महिला मंडळ, इचलकरंजी’ यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय स्पर्धांचे आयाेजन करण्यात आले आहे.
रविवार 26 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत चित्रकला, सामान्यज्ञान, बुद्धीबळ, निबंध, वक्तृत्व, पाठांतर, गायन आणि वेशभूषा अशा विविध स्पर्धांचे आयाेजन ’संत नामदेव भवन’ येथे करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी हाेऊ शकतात. शाळांर्माफत नांव नाेंदणीची अंतिम तारीख 22 जुलै आहे .स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाणार असून 22 ऑगस्ट राेजी सायंकाळी 4.30 वाजता पारिताेषिक वितरण समारंभ हाेईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी किंवा शाळांनी संत नामदेव भवन येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयाेजकांर्ते करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







