ICHMH51NEWS.IN
9921600800

भारत टेक्स 2026 मध्ये इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाचा दमदार ठसा; 30 उद्योजकांचा सहभाग

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भारत टेक्स 2026 मध्ये इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाचा दमदार ठसा; 30 उद्योजकांचा सहभाग

नवी दिल्ली / इचलकरंजी : देशातील सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन व परिषद भारत टेक्स 2026 ला 14 जुलैपासून भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे उत्साहात सुरुवात झाली आहे. 14 ते 17 जुलैदरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते झाले.

भारत टेक्स ट्रेड फेडरेशन (BTTF) आणि केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात यंदा जगभरातील 160 देशांचे प्रतिनिधी, 3,500 हून अधिक प्रदर्शक, 7,000 आंतरराष्ट्रीय खरेदीदार (बायर्स) आणि सुमारे 1.30 लाख व्यापारी अभ्यागत सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘5F – Farm to Fibre to Factory to Fashion to Foreign’ या संकल्पनेवर आधारित हा जगातील सर्वात मोठा इंटिग्रेटेड टेक्सटाईल व्हॅल्यू चेन इव्हेंट मानला जात आहे.

यावर्षी महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यांनी स्वतंत्र पॅव्हेलियन उभारले असून, महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग सचिव अंशू सिन्हा, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, वस्त्रोद्योग आयुक्त दैने, उपसचिव श्रीकृष्ण पवार, उपायुक्त व्हडकर तसेच अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते.

प्रदर्शनादरम्यान माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे आणि महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी ,आ.अशोकराव माने यांनी इचलकरंजीच्या उद्योजकांनी उभारलेल्या स्वतंत्र पॅव्हेलियनला भेट देऊन माहिती घेतली. इचलकरंजीतील सुमारे 30 वस्त्रोद्योजकांनी या जागतिक प्रदर्शनात सहभाग नोंदवून शहराच्या वस्त्रोद्योगाची क्षमता देश-विदेशातील व्यापाऱ्यांसमोर मांडली.

भारत टेक्स 2026 मुळे इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, निर्यात वाढ, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि नव्या व्यावसायिक संधी निर्माण होण्यास मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास सहभागी उद्योजकांनी व्यक्त केला.

उद्घाटन करताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,अंशु सिन्हा अशोक स्वामी

इचलकरंजीतील स्टॉल ना भेट देताना मंत्री संजय सावकारे, माजी मंत्री प्रकाश आवाडे,अशोक स्वामी,चंद्रकांत पाटील,गोरखनाथ सावंत

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा