कराओके गीत गायन स्पर्धेत वैष्णवी चव्हाण प्रथम
इचलकरंजी-
सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वरांश गीत संगीत शाहिरी लाेककला संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कराओके गीत गायन स्पर्धेत वैष्णवी चव्हाण (वेंगुर्ला) यांनी प्रथम, सपना पाटील (काेल्हापूर) यांनी द्वितीय तर मुकुंद चाैगुले (इचलकरंजी) यांनी तृतीय क्रमांक मिळिवला. तर गाैरी शिंदे (काेल्हापूर) व बाबासाे कडाेले (जयसिंगपूर) यांना उत्तेजनार्थ पारिताेषिक देण्यात आले.
पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ येथे आयाेजित स्पर्धेत इचलकरंजी परिसरासह कणकवली, वेंगुर्ला, कराड सांगली, मिरज व गळदगा या सीमावर्ती भागातील 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला हाेता. स्पर्धेचा शुभारंभ अहमद मुजावर, परीक्षक महेश हिरेमठ, साै.शुभांगी जाेशी, साै. संगीता कसलकर, साै. केतकी पाटील-शेंडूरे आदी मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी सहभागी सर्वच स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व दादांचे जीवन कार्य या पाेवाड्याचे पुस्तकदेण्यात आले.
शाहीर संजय जाधव यांनी आवाडे दादांचे जीवनकार्यावर लिहिलेल्या ऑडिओ पाेवाड्याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पाेवाड्यासाठी सहकलाकार केतकी पाटील, रंजना पाटील, पुनम चाैगुले व सुरज रवंदे यांनी साथ दिली. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे सदस्य शितल बमन्नावर, केतकी पाटील, सचिन आरगे, संजय पवार, कृष्णकांत पाेवार, काशिनाथ वनमाेरे, दशरथ बाेंगे, धाेंडीराम पाटील आदींनी परिश्रम घेतले. रुद्रा साउंड यांनी ध्वनी व्यवस्था केली हाेती. प्रास्ताविक शाहीर संजय जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सुरज रवंदे यांनी केले.
बक्षिस वितरण समारंभावेळी घेतलेले छायाचित्र
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







