प्रबोधन ज्योती मासिक ही सकस वैचारिक शिदोरी
एम. बी. शेख यांचे प्रतिपादन
इचलकरंजी:
समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली सदतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणारे “प्रबोधन प्रकाशन ज्योती” मासिक म्हणजे लोकप्रबोधन करणारी सकस स्वरूपाची वैचारिक शिदोरी आहे. या मासिकाचा प्रत्येक अंक अतिशय वाचनीय व संग्राह्य असतो. तसेच राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय राजकीय, सामाजिक, संस्कृतीक , आर्थिक अशा सर्व बाबींचा अतिशय सोप्या भाषेत परामर्श घेणाऱ्या या मासिकाचे सामाजिक बांधिलकी असलेल्या सर्वांनी सभासद झाले पाहिजे. तसेच समाजवादी प्रबोधिनीच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रबोधिनीने केलेल्या आवाहनालाही प्रत्येकाने प्रतिसाद दिला पाहिजे असे मत रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एम.बी.शेख यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या ‘ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाच्या जुलै २०२६ च्या अंकाचे प्रकाशन करतांना बोलत होते.
या अंकात प्रसाद कुलकर्णी यांच्यासह डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. दशरथ पारेकर, प्राचार्य आनंद मेणसे, जगदीश काबरे, रफिक सुरज आदींचे विविध विषयांवरील लेख आहेत. या अंकाच्या मुखपृष्ठावर ज्येष्ठ कवी व चित्रकार प्रमोदकुमार अणेराव यांचे अप्रतिम चित्र आहे. या प्रकाशनावेळी
आयटकचे ज्येष्ठ नेते कॉ. दिलीप पवार, प्राचार्य आनंद मेणसे, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील ,प्रा. अशोक चव्हाण, बी.के.कांबळे आणि संपादक प्रसाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रबोधन प्रकाशन ज्योतीच्या जुलै अंकाच्या प्रकाशनावेळी एम बी शेख,प्रसाद कुलकर्णी, प्रा.आनंद मेणसे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








