डीकेटीईच्या तीन विद्यार्थ्यांची ट्रायडेंटमध्ये १२ लाखांच्या पॅकेजवर निवड
इचलकरंजी :
येथील डीकेटीई संस्थेच्या टेक्स्टाईल विभागातील सुमिरन पांडे, श्रीकांत धुळे आणि श्रुती गौड या तीन विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ट्रायडेंट ग्रुपमध्ये वार्षिक १२ लाख रुपयांच्या आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे.
होम टेक्स्टाईल क्षेत्रातील अग्रगण्य ट्रायडेंट ग्रुपची उत्पादने ७५ हून अधिक देशांमध्ये निर्यात होतात. कंपनीने डीकेटीईमध्ये कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रिया राबवून २८ विद्यार्थ्यांची ऑनलाइन चाचणीसाठी निवड केली. त्यानंतर १० विद्यार्थ्यांनी सायकोमेट्रिक चाचणी दिली. अंतिम टप्प्यात तांत्रिक व एचआर मुलाखतीनंतर तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
उद्योगविश्वाच्या गरजांनुसार डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांना अॅप्टिट्यूड, सॉफ्ट स्किल्स, तांत्रिक ज्ञान आणि मुलाखत कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे संस्थेची गुणवत्तापूर्ण प्लेसमेंटची परंपरा कायम राहिली आहे.
दरम्यान, तृतीय वर्षातील शुभम आलासे व सुखदा गणोकर यांची ट्रायडेंटमध्ये दोन महिन्यांच्या समर इंटर्नशिपसाठी निवड झाली असून त्यांना ५० हजार रुपयांचे विद्यावेतन मिळणार आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, उपसंचालक डॉ. यू. जे. पाटील आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. एस. बी. अकिवाटे यांनी अभिनंदन केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





