ICHMH51NEWS.IN
9921600800

कन्या महाविद्यालयातील गृहविज्ञान विभागाचा माजी विद्यार्थिनी मेळावा उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कन्या महाविद्यालयातील गृहविज्ञान विभागाचा माजी विद्यार्थिनी मेळावा उत्साहात संपन्न

इचलकरंजी :

श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथील गृहविज्ञान विभागाच्या वतीने मंगळवार (दि. २१ जुलै) माजी विद्यार्थिनी मेळाव्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. श्रुती जोशी होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थिनींना कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होत असताना आपण ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतले, त्या संस्थेशी कायम नाळ जुळलेली असावी, असे सांगितले. आयुष्यभर सातत्याने शिकत राहण्याची वृत्ती जोपासावी, असे आवाहन करत समाजऋण म्हणून माजी विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या विकासासाठी विविध प्रकारे सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आय.क्यू.ए.सी. प्रमुख प्रा. वर्षा पोतदार यांनी रोजगाराच्या दृष्टीने शासनाच्या National Apprenticeship Training Scheme (NATS) Portal 2.0 विषयी सविस्तर माहिती देत विद्यार्थिनींना उपलब्ध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत गृहविज्ञान विभागप्रमुख प्रा. संगीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्वाती हाळवणकर यांनी केले, तर प्रा. प्राजक्ता पेटकर यांनी आभार मानले.

या मेळाव्यामुळे माजी विद्यार्थिनी आणि महाविद्यालय यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाले असून, भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे परस्पर सहकार्य वाढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा